राजेश नार्वेकर यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई : राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागी नवे परिवहन आयुक्त म्हणून राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नार्वेकर हे सध्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते.


राजेश नार्वेकर हे २००९ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून, प्रशासनातील विविध स्तरांवर काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. १९९४ मध्ये महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतून उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. नार्वेकर यांनी यापूर्वी म्हाडा, नोंदणी व मुद्रांक विभाग, तसेच एमआयडीसीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.


२०१८ ते २०२२ या काळात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यशस्वी कामकाज पाहिले. ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपद भूषवले. २०१६ ते २०१७ या काळात त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. राजेश नार्वेकर यांच्या कामाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 'स्वच्छ भारत मिशन'मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बजावलेल्या चोख भूमिकेबद्दल त्यांना गौरविण्यात आले होते. विशेषतः कोविड-१९ च्या काळात त्यांनी केलेल्या उपाययोजनांची दखल घेत राज्यपालांच्या हस्ते त्यांना 'सेवा पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे.


दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातही त्यांचे मोठे योगदान असून, त्यासाठी त्यांनी जपानमधील ओसाका येथे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. आता राज्याच्या परिवहन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, या विभागातील प्रलंबित प्रश्न आणि डिजिटलायझेशनला ते कशी गती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने