बदलापूरमध्ये IVF सेंटरमध्ये बेकायदा स्त्रीबीज विक्री प्रकरण; तीन महिलांना अटक

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात पैश्यांचे आमिष देत महिलांकडून स्त्रीबीज संकलन करून त्यांची अवैध विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.



गुप्त माहितीवरून कारवाई


जोवेली परिसरातील नॅनो सिटी येथील एका सदनिकेत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या पथकाने बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत छापा टाकला. कारवाईदरम्यान बीजोत्सर्जन वाढवण्यासाठी वापरली जाणारी इंजेक्शने आणि वैद्यकीय साहित्य आढळून आले.



महिलांना पैशांचे आमिष


प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना संपर्क करून त्यांना पैश्याचे आश्वासन दिले जात होते. संबंधित महिलांना स्त्रीबीज वाढवण्याचे इंजेक्शन देण्यात येत होते त्यानंतर महिलांना आयव्हीएफ केंद्रात पाठवून स्त्रीबीज काढून त्यांची विक्री केली जात होती.



मोबाईलमधून धक्कादायक पुरावे


मुख्य आरोपीच्या मोबाईलमध्ये विविध महिलांची कागदपत्रे, कथित बनावट प्रतिज्ञापत्रे, सोनोग्राफी अहवाल, औषधांची माहिती आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित छायाचित्रे आढळली आहेत. या आधारे गरजू महिलांचा पुन्हा पुन्हा ‘डोनर’ म्हणून वापर केल्याचा संशय बळावला आहे.



तिघींना अटक, आणखी तपास सुरू


या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर (४४), अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडे (४६) यांना अटक करण्यात आली आहे. परिमंडळ चार, उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये २० हून अधिक महिलांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिलेला अंदाजे २५ ते ३० हजार रुपये देण्यात येत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. या अवैध जाळ्यामागे आणखी कोणी आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर