महावीर नगर ,पोयसर जिमखाना परिसर अतिक्रमण मुक्त

वाढीव बांधकामे आणि अनधिकृत स्टॉल्स जमीनदोस्त


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली आणि कांदिवली येथील अनधिकृत बांधकाम अंक फेरीवाले यांच्या विरोधातील कारवाई सुरू असून शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी बोरिवली (पश्चिम) आणि कांदिवली (पश्चिम) येथील महावीर नगर परिसरातील मिळून २५ अनधिकृत बांधकामे आणि ३५ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली.


उप आयुक्त (परिमंडळ ७) संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाने, सहाय्यक आयुक्त (आर मध्य विभाग) डॉ. प्रफुल तांबे आणि सहायक आयुक्त (आर दक्षिण विभाग) आरती गोळेकर यांच्या नेतृत्वात ‘आर दक्षिण’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत विविध विभागांकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन, इमारत व कारखाने तसेच घनकचरा व्यवस्थापन या विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली.


महावीर नगर, पोयसर जिमखाना परिसरात अनधिकृत बांधकामे निर्माण झाली होती. तसेच, अनधिकृत फेरीवालेही आढळून आले होते. यामुळे, परिसरातील वाहतुकीस आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यात अडथळा येत होता. या पार्श्वभूमीवर, ‘आर दक्षिण’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत विविध विभागांकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली.


३ जेसीबी, ५ डंपर आदी संयंत्रासह सुमारे ५० अधिकारी व कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त देखील होता. या कारवाईमुळे नागरिकांसाठी रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या. यापुढेही अनधिकृत बांधकामे, अनधिकृत फेरीवाले आदीविरोधातील कारवाई सुरु राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने