मुंबई मोनोरेलच्या नवीन रेक (Rolling Stock) व सीबीटीसी -आधारित सिग्नलिंग प्रणालीस सुरक्षा प्रमाणन प्राप्त

मुंबई :  मुंबई मोनोरेलच्या नवीन रेक (RST) तसेच सीबीटीसी-आधारित सिग्नलिंग प्रणालीस स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता (Independent Safety Assessor – ISA) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र यशस्वीरित्या प्राप्त झाले आहे.

हे प्रमाणपत्र खालील महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रदान करण्यात आले आहे :


•उत्पादन प्रकल्प (कारखाना स्तर) येथे नवीन रेकची सविस्तर तपासणी

•मंजूर आराखडे व कठोर सुरक्षा मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी व्यापक स्थिर (Static) व गतिशील (Dynamic) चाचण्या

•ऑसिलेशन चाचण्यांची यशस्वी पूर्तता

•इजिप्त मोनोरेलमध्ये वापरण्यात आलेल्या प्रणालीस अनुरूप CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणालीची स्थापना व इंटरफेस-स्तरीय चाचणी

•प्रमाणपत्रापूर्वी आयएसए (ISA) मार्फत सर्वंकष सुरक्षा मूल्यांकन, दस्तऐवज पडताळणी व प्रोटोकॉल व्हेरिफिकेशन.

•मागील दोन महिन्यांमध्ये मोनोरेल मार्गिकेच्या विविध टप्प्यांवर कठोर चाचण्या घेऊन संपूर्ण प्रणाली एकत्रीकरण व कार्यसज्जतेची खातरजमा

याशिवाय, प्रवासी सोय, सुरक्षितता व कार्यक्षमतेत वृद्धी करण्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांची कठोर चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :


•प्रगत सस्पेन्शन प्रणाली, मेट्रो-मानकानुसार प्रशस्त अंतर्गत रचना व दिव्यांग-स्नेही आसनव्यवस्था, ज्यामुळे प्रवास अधिक स्थिर व आरामदायी होईल

•एलईडी प्रकाशयोजना, चार्जिंग सॉकेट्स तसेच अंतर्गत व बाह्य गतिशील प्रवासी माहिती प्रणाली, ज्यामुळे प्रवाशांना रिअल-टाईम माहिती व अधिक सुविधा उपलब्ध होतील

•आंतरराष्ट्रीय अग्निसुरक्षा मानकांचे पालन, स्वयंचलित अग्निशमन व शोध प्रणाली, सीसीटीव्ही देखरेख, रिअल-टाईम मॉनिटरिंग, सुधारित कपलर्स व इव्हेंट रेकॉर्डर्स, ज्यामुळे सुरक्षितता व विश्वासार्हतेत वाढ

•आयपी-आधारित ट्रेन नियंत्रण प्रणाली, ऊर्जा-कार्यक्षम मोटर्स व स्वदेशी उत्पादन, ज्यामुळे कार्यक्षमतेमध्ये वाढ,कमी ऊर्जेचा वापर , दीर्घकालीन देखभाल सुलभता, आयातीवरील अवलंबित्व कमी होणे तसेच “मेक इन इंडिया” उपक्रमास प्रोत्साहन


२. सद्यस्थितीत, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत अभियंत्याची नियुक्ती प्रक्रियेत आहे. नियुक्त अभियंता संपूर्ण मोनोरेल मार्गिकेची सविस्तर तपासणी करून प्रवासी वाहतुकीसाठी अंतिम वैधानिक प्रमाणपत्र प्रदान करणार आहेत.

३. अंतिम मंजुरी प्राप्त होताच, सार्वजनिक हित व मुंबईकरांच्या सोयीसाठी नवीन रेकसह मोनोरेल सेवा लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

४. एमएमओसीएल मुंबईकरांना सुरक्षित, विश्वासार्ह व कार्यक्षम मोनोरेल सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यास पूर्णतः कटिबद्ध आहे.


मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नवीन मोनोरेल रोलिंग स्टॉक आणि प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीसाठी प्राप्त झालेली यशस्वी सुरक्षा प्रमाण पत्र ही महाराष्ट्र शासनाची प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची ठाम बांधिलकी आणि स्वदेशी नवोन्मेषाबाबतचा अविचल निर्धार यांचे प्रतिबिंब आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या प्रणालींना कठोर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निकष व स्वतंत्र मूल्यमापन प्रक्रियेअंतर्गत तपासण्यात आले असून, त्यामुळे आमच्या परिवहन तंत्रज्ञानाचा पाया आधुनिकतेसोबतच भक्कम आणि विश्वासार्ह असल्याची खात्री करण्यात आली आहे.

ही प्रमाणपत्र प्रक्रिया केवळ तांत्रिक मंजुरी नसून, प्रत्येक मुंबईकरासाठी विश्वासाची अधिकृत मोहर आहे. वेगवान शहरी गतिशीलतेचा आमचा पाठपुरावा नेहमीच सर्वोच्च सुरक्षा मानके आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेच्या आधारावरच राहील, याची ही ठोस ग्वाही आहे.”


उपमुख्यमंत्री मा.  एकनाथ शिंदे  अध्यक्ष, एमएमआरडीए म्हणाले की, नवीन मोनोरेल रोलिंग स्टॉक व प्रगतसीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीसाठी प्राप्त झालेली यशस्वी सुरक्षा प्रमाणपत्र ही प्रत्येक मुंबईकराला सुरक्षित व आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्याचा एमएमआरडीएच्या बांधिलकीची ठोस हमी आहे. कठोर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निकष आणि स्वदेशी अभियांत्रिकीला प्राधान्य देत, या परिवहन व्यवस्थेचा मुख्य पाया आता संपूर्ण विश्वासार्हतेवर उभारण्यात आला आहे. ही प्रमाणपत्र प्रक्रिया केवळ तांत्रिक टप्पा नसून, मुंबईतील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी सर्वोच्च सुरक्षा मानके, प्रवासी कल्याण आणि कार्यप्रणालीतील पारदर्शकता यांची हमी देणारी ठाम हमी आहे.”


डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से.महानगर आयुक्त,एमएमआरडीए, म्हणाले की, “मुंबई मोनोरेलचे आधुनिकीकरण हे आमच्या व्यापक ‘मुंबई इन मिनिट्स’ या दृष्टीकोनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्यामध्ये अखंड जोडणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधला जात आहे. नवीन रेक्स आणि सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीसाठी यशस्वीरीत्या प्राप्त झालेली सुरक्षा प्रमाणन ही केवळ तांत्रिक उन्नती नसून, वारसा पायाभूत सुविधांचे भविष्योन्मुख परिवहन संपदेमध्ये रूपांतर करण्याच्या आमच्या ठाम निर्धाराचे प्रतीक आहे.


‘मेक इन इंडिया’ आणि स्वदेशी नवोन्मेषाला प्राधान्य देत, मोनोरेल ही आमच्या एकात्मिक बहुआयामी वाहतूक जाळ्यात उच्च-कार्यक्षम दुवा म्हणून कार्यरत राहील, याची आम्ही खात्री करत आहोत. प्रत्येक मुंबईकराला जागतिक दर्जाच्या सुरक्षा, विश्वासार्हता आणि सन्मानपूर्ण प्रवासाचा अनुभव देणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे.”
Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म