शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री!

मुंबई-दिल्लीत रंगणार सुरांची मैफल


जागतिक संगीत क्षेत्रातील दिग्गज नाव आणि आपल्या मनमोहक डान्स मूव्हसने लाखो चाहत्यांना भुरळ घालणारी पॉप स्टार शकीरा तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय रंगमंचावर अवतरणार आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक दौऱ्यात शकीरा केवळ एका नव्हे, तर मुंबई आणि दिल्ली अशा दोन प्रमुख शहरांमध्ये तिचे धमाकेदार कॉन्सर्ट सादर करणार आहे. या बातमीमुळे भारतीय संगीत प्रेमींमध्ये आनंदाचे उधाण आले असून सोशल मीडियावर या दौऱ्याचीच चर्चा रंगली आहे.


शकीराचा पहिला परफॉर्मन्स १० एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार असून त्यानंतर १५ एप्रिल रोजी दिल्लीत ती आपल्या आवाजाची जादू दाखविणार आहे. शकीराचा भारत दौरा दोन शहरांमध्ये आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शकीरा आणि भारताचे नाते जुने आहे. तिने शेवटचा परफॉर्मन्स २००७ मध्ये मुंबईत तिच्या ‘ओरल फिक्सेशन टूर’ दरम्यान दिला होता. त्यानंतर आता तब्बल १९ वर्षांनी ती भारतात परतत आहे. या पुनरागमनाबद्दल शकीरा स्वतः अत्यंत उत्साही आणि भावुक आहे. ती म्हणते की, “भारतात परफॉर्म करणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. मुंबई आणि दिल्लीतील चाहत्यांशी पुन्हा एकदा जोडले जाणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल.” विशेष म्हणजे, हा ‘फीडिंग इंडिया कॉन्सर्ट’ असून या माध्यमातून ती मुलांचे पोषण आणि उज्ज्वल भविष्याचा संदेश देणार आहे.


शकीराची संगीत कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळ गाजलेली आहे. ९० च्या दशकात तिने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच ती जगातील सर्वात लोकप्रिय पॉप सिंगर्सच्या यादीत अग्रस्थानी पोहोचली. तिचे ‘हिप्स डोन्ट लाय’, ‘व्हेनएव्हर, व्हेरएव्हर’, ‘वाका वाका’ (फिफा वर्ल्ड कप अँथम), ‘शी वुल्फ’ आणि ‘ला टोर्टुरा’ यांसारख्या गाण्यांनी तिला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. शकीराची ऊर्जा, तिची खास बेली डान्स शैली आणि स्टेजवरील उपस्थिती भारतीय प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर