Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ (कालावधी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५) अंतर्गत अमृत गटात १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या गटामध्ये ठाणे महानगरपालिकेला तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.


या कालावधीत ठाणे महापालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. भुमी घटकांतर्गत ८१,७३४ झाडांची लागवड, ९९ नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती, ७२९ हेरिटेज वृक्षांची नोंद व सर्वेक्षण, तसेच कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली. जैववैद्यकीय, ई-कचरा व C&D कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात संकलन व पुनर्चक्रिकरण करण्यात आले.


वायू घटकांतर्गत हवेच्या गुणवत्तेचे पाच ठिकाणी नियमित निरीक्षण, हरित फटाक्यांबाबत जनजागृती, बांधकामांवरील प्रदूषण नियंत्रण उपाययोजना तसेच Heat Resilience व Flood Action Plan तयार करण्यात आला. जल संवर्धनांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग, मलजल प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता, विहिरींचे पुनरुज्जीवन आणि तलाव संवर्धनासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.


अग्नी घटकांतर्गत एलईडी पथदिवे, ई-बस सेवा, ईव्ही चार्जिंग स्टेशन, सोलार रूफटॉप आणि सोलार वॉटर हिटर यांसारख्या ऊर्जा बचत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.आकाश घटकांतर्गत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ई-प्रतिज्ञा घेतल्या असून शेकडो जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांच्या आधारे ठाणे महानगरपालिकेने पर्यावरण संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु