Budget Session : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव, अजित पवारांना श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजूपासून म्हणजेच सोमवार २३ फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे. आज सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय सादर करतील.


अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भावनाचे वातावरण भावूक होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.


अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जाईल आणि त्यांच्याच हस्ते वाचून दाखवला जाईल. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबाबत सभागृहात मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य हे सभागृहात आपली भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण