Maharashtra Budget Session 2026 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खाती सोपवली अन्य मंत्र्यांकडे

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशन कालावधीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील खात्यांची जबाबदारी मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांकडे दिली आहे.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून शिंदे यांनी पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवत असल्याची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्याकडे एकाहून अधिक खात्यांचा कारभार असून, ते विधानपरिषदेचे सभागृह नेते देखील आहेत. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही सभागृहाचे कामकाज हाताळणे शक्य नसल्याने त्यांनी आपल्याकडील खात्यांचा कार्यभार आपल्या पक्षातील मंत्र्यांकडे सोपवला आहे. स्वतःकडील विभागांचा कार्यभार सांभाळून हे मंत्री अतिरिक्त खात्यांचा कारभार पाहतील.


एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे, नगर विकास विभाग मंत्री उदय सामंत यांच्याकडे, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अधिवेशन कालावधीत ते या खात्याचे प्रभारी मंत्री म्हणून उत्तरे देतील.

Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही