मुंबई महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सादर केला. ४२४८.०८ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून असून चालू शैक्षणिक वर्षापेक्षा सुमारे ३०० कोटी रुपयांनी याचा आकार वाढवण्यात आला आहे. शिक्षणातील दरी साधण्यासाठी आणि प्रत्येक बालकास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे ग्वाही या अर्थसंकल्पीय भाषणात व्हावे अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय छात्र सेना हा उपक्रम


मुंबई महापालिकेच्या इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीसी पथकाची ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ एनसीसी यांच्याकडे करण्यात येणार आहे. तसेच आगामी शैक्षणिक वर्षात शारीरिक शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय छात्र सेना हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले आहे.

आणखी ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत महापालिकेच्या ५५ शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उभारणीचे काम पूर्ण झाले असून सन २०२६-२७ मध्ये आणखी ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत.

इंग्रजी भाषा प्रयोगशाळा


मुंबई महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता २७९ इंग्रजी भाषा प्रयोगशाळा स्थापन करण्याचे काम सुरू आहे यासाठी ३. ८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

 

विज्ञान पारिजात पाच कोटी रुपयांची तरतूद


मुंबई महापालिकेच्या दोन शालेय इमारतींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर विज्ञान पार्क उभारण्यासाठी कार्यदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे .यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सायबर साक्षरता प्रशिक्षण


महापालिकेच्या आठवी व इयत्ता नववीच्या २०,००० विद्यार्थ्यांना नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल यांच्या माध्यमातून सायबर साक्षरता प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करताना काय दक्षता घ्यावी हे समजण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्याचे ज्ञान मिळेल. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.या कौन्सिल मार्फत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच हे या प्रशिक्षणाचे क्रेडिट पॉईंट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये जमा होणार आहेत. या कविता ११.८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तब्बल १९,३१७ मुलांना टॅब


शालेय विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी व बदलत्या काळ आधुनिक शिक्षण मिळण्यासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना सन 2025 26 मध्ये १९,३१७ टॅबचा पुरवठा करण्यात येत आहे. याकरता अर्थसंकल्पात सुमारे २२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पोक्सो कायद्याबाबतचा मार्गदर्शन


मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि त्याविषयी असणारे कायदे याबाबत जनजागृती व्हावी यासाठी अभया ही पोक्सो कायद्यासंदर्भातली नाटिका दाखवण्यात आली. लैंगिक समानता लैंगिक अत्याचार प्रतिबंधक उपायांविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातही राबवण्यात येणार आहे.

ड्रग्स व व्यसनाधीनता यावर जनजागृती


समाजात दिसून येणारे ड्रग्स व्यसनाधीनता कक्षात घेऊन सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांमध्ये ड्रग्स व व्यसनाधीनता यांचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजित आयोजन करण्यात येणार असल्याचेही नमूद केले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे


मुंबई महापालिकेच्या शहर विभागातील शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तसेच २०२५-२६ मध्ये मुंबई महापालिकेच्या उपनगर विभागातील शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही सुरू आहे यासाठी ४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

डेस्क आणि चेअर्सची खरेदी


महापालिका शाळांमधील नर्सरी ती इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी २४,१७०डेस्क व २९,१७८ चेअर्सचे वाटप करण्यात आले आहे. सन २०२६-२७ मध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी२८,४७० डेस्क आणि ४४,९३८ चेअरची खरेदी निविदा प्रक्रिया सुरू असून यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षकांना प्रशिक्षण


नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बदलणारे अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तसेच नवीन अध्ययन अध्यापन प्रक्रिया याची सखोल माहिती देण्यासाठी सन २०२६-२७ मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षकांकरिता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे

दिव्यांग विद्यार्थी थेरपी साहित्य


महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विशेष दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने महापालिकेद्वारे विविध प्रकारच्या थेरपी देण्याची सोय केली जाते.या थेरपी अधिक प्रभावी पद्धतीने देण्याकरता आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सांघिक खेळाला प्राधान्य


मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सांघिक खेळाची रुची निर्माण व्हावी आणि सांघिक खेळासाठी प्रेरणा मिळावी, खेळाचा सराव करता यावा तसेच शारीरिक तंदुरुस्ती व्हावी यासाठी शाळा इमारतीच्या आवारात बास्केटबॉल हाफ कोर्ट,फुलकोर्ट, टेबल टेनिस, पिन बॉल व क्रिकेट नेटपीच इत्यादी सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्य शासनाकडे ७२४१.३८ कोटींची थकबाकी


राज्य शासनाकडून मुंबई महापालिकेला ३१मार्च २०२५ पर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या खर्चापोटी ५६५५.३० कोटी व माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी १५८६.०८ कोटी अशी एकूण ७२४१.३८ कोटी इतकी रक्कम येणे बाकी आहे याबाबत महापालिका प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची असल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने