होळीचा सण आलाय, महिला बचत गटाच्या पुरणपोळीसाठी महापालिकेची मार्केटिंग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : होळीचा सण जवळ आला की सारेच जण ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’, अशी हाळी देतात. मुंबईकरांना होळीच्या सणाला घरपोच पुरणपोळीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. होळी सणाच्या निमित्ताने महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या पुरणपोळ्या मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी २६फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान ‘पुरणपोळी महोत्सव २०२६’ होणार आहे. या अंतर्गत shgeshop.com या संकेतस्थळावर नागरिक ऑनलाईन नोंदणी करू शकतात. त्यानंतर २ मार्च २०२६ रोजी पुरणपोळ्यांचे घरपोच वितरण केले जाणार आहे.


मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या या महिला बचत गटांनी गत वर्षी गुढीपाडव्याच्यानिमित्ताने पुरणपोळी महोत्सव राबविला होता. त्याला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता सार्वजनिक श्रीगणेशोत्सव-२०२५ च्या पार्श्वभूमीवर या महिला बचत गटांकडून ‘मोदक महोत्सव- २०२५’ चे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुरणपोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे.


होळीच्या दिवशी पुरणपोळीला खूप मागणी असते. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करून महिला बचत गटांनी हा महोत्सव सुरू केला आहे. या अंतर्गत पारंपरिक पुरणपोळी ग्राहकांना मिळणार आहेत. ज्यांना बचत गटांनी तयार केलेली पुरणपोळी हवी असेल त्यांनी shgeshop.com या संकेतस्थळावर २६ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ या कालावधी दरम्यान ऑनलाईन मागणी नोंदवायची आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर, होळीच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक ३ मार्च २०२६ रोजी संबंधित ग्राहकांना पुरणपोळी घरपोच मिळणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म