क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्याशी निगडित ऐतिहासिक स्थळ असून भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात त्यास विशेष राष्ट्रीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.


भारताच्या संविधानातील कलम १४ (समानता), कलम ४९ (राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण) व कलम ५१अ(फ) (सांस्कृतिक वारसा जपणे हे नागरिकांचे कर्तव्य) या तरतुदींनुसार अशा स्थळांचे संरक्षण करणे ही घटनात्मक जबाबदारी आहे.


Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 अंतर्गत केंद्र सरकारला एखाद्या स्थळास “राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक” घोषित करण्याचा वैधानिक अधिकार आहे.


भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नी सावरकर सदन ला राष्ट्रीय स्मारकचा मान देण्याचे नाकारले आहे. फक्त सावरकर सदन १०० वर्ष जुने नाही म्हणून १०० वर्षाची अट का?



काही स्थळ एखादी गोष्ट झाल्या वर लगेच राष्ट्रीय स्मारक होते


 

उदारणार्थ - परमवीर चक्र विजेता मेजर शैतान सिंग व कुमाऊ रेजिमेंट १३ बटालियन च्या ११४ जवानांनी रेझान्गला दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची जागा किंवा शहीद तुकाराम ओंबळे यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची जागा



तर काही स्थळ १०० वर्ष राहाणरच नाही जसे सावरकर सदन


 

मुळातच राष्ट्रीय स्मारक साठी १०० वर्षाची अट का?



ही अट लगेच काढण्यात यावी त्याचसाठी ज्ञानदा प्रबोधन संस्था , समर्थ प्रतिष्ठान आणि शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे मुंबईभर स्वाक्षरी अभियान करण्यात येणार असून महिन्याभरात किमान १० हजार स्वाक्षरीच्या पाठिंब्याचे पत्र देशाच्या आदरणीय राष्ट्रपती, आदरणीय पंत्रप्रधान,मुख्य न्यायाधीश आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे. त्याच सोबत २०१६ पासून ज्ञानदा प्रबोधन संस्थेतर्फे सातत्याने सावरकरांच्या नावाने शौर्य पुरस्कार सुरु करावा तसेच शालेय पाठ्यक्रमात सावरकरांच्या राष्ट्रभक्तीविषयी अभ्यासक्रमात शिकवले जावे ह्या मागण्याहि करण्यात येणार आहेत.


स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ - गुरुवार दि.२६ फेब्रुवारी २०२६
वेळ :- सायंकाळी ६ वाजता
स्थळ :- सावरकर सदन, डॉ.एम.बी राऊत मार्ग , बालमोहन शाळेशेजारी, दादर (प),मुंबई - २८


कृपया ह्या स्वाक्षरी अभियानाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी हि नम्र विनंती.


आपला
प्रशांत जनार्दन पळ
अध्यक्ष, ज्ञानदा प्रबोधन संस्था
मो. 7021098499

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर