महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान प्रदर्शन व माझी परसबाग प्रकल्प’ सारखे अभिनव उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक संकल्पनांना व्यासपीठ मिळते. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील विकसित भारताचा पाया आहेत. विज्ञान हा विषय पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकातून जास्त उमगतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोनदा आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहावे, असे मत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचे व्यक्त केले.


मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्यावतीने महानगरपालिका शाळांतील प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर विजेत्या शाळांचे ‘विज्ञान प्रदर्शन व माझी परसबाग’ आणि पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करी रोड येथील ना. म. जोशी शाळा संकुल येथे गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या एकूण २३ शाळांचे विज्ञान प्रकल्प प्रदर्शनार्थ मांडण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर या बोलत होत्या.


उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तीवर्धन किरतकुडवे, शाळा अक्षीक्षक छाया साळवे, सर्व उप शिक्षण अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि सहभागी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.


महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेले हे विज्ञान प्रदर्शन पाहून अतिशय आनंद होत आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने या प्रदर्शनातून अनेक वैज्ञानिक कल्पनांना मूर्त रुप आले आहे. हे प्रदर्शन खरोखरच अतिशय उत्कृष्ट आहे. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील विकसित भारताचा पाया आहेत. विज्ञान हा विषय पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकातून जास्त उमगतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोनदा आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी नमूद केले.


या प्रदर्शनात प्रामुख्याने शून्य कचरा नियोजन, गणितीय सूत्रांवर आधारित प्रकल्प, ई-सायकल मिशन, सेंद्रीय शेती, स्मार्ट सिटी, हायड्रोईलेक्ट्रीक पॉवर जनरेटर, वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, पूर सूचना प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा प्रणाली व सुरक्षा उपाययोजना यासह विविध विषयांवरील विज्ञान प्रकल्पांचा समावेश होता.


विज्ञान प्रदर्शनात शालेय खुला गटामध्ये पी/दक्षिण विभागातील मिठानगर मुंबई पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेने कचरा व्यवस्थापन विषयावरील प्रकल्प सादर करुन प्रथम क्रमांक पटकावला. एन विभागातील पंतनगर मुंबई पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेने ‘SMART SPIKE DEFFENCE SYSTEM’ या विषयावरील प्रकल्प सादर करुन द्वितीय क्रमांक पटकावला, तर एफ उत्तर विभागातील सायन मुंबई पब्लिक स्कूलने अग्निशमन यंत्रणा नियोजन विषयावरील प्रकल्प सादर करुन तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही शाळांना अनुक्रमे ११ हजार, ८ हजार आणि ५ हजार रुपयांचे रोख रक्कम स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.


परसबाग प्रकल्प शालेय खुला गटामध्ये ई विभागातील मोमीनपुरा मुंबई पब्लिक स्कूल (सेमी इंग्रजी माध्यम) शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. एन विभागातील बर्वेनगर मराठी शाळेने द्वितीय तर पी दक्षिण विभागातील आय. बी. पटेल मुंबई पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही शाळांना अनुक्रमे ११ हजार, ८ हजार आणि ५ हजार रुपयांचे रोख रक्कम स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.