अजित पवार विमान अपघात प्रकरणी 'तो' अहवाल आज येणार! तांत्रिक बिघाड की मोठा घातपात ?

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेला 'प्राथमिक तपास अहवाल' (Preliminary Investigation Report) आज सायंकाळी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) हा अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (DGCA) सुपूर्द करणार असून, यातून अपघाताच्या नेमक्या कारणांवरून पडदा उठण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे, कारण हा तपास केवळ तांत्रिक स्वरूपाचा नसून गुन्हेगारी कोनातूनही केला जात आहे. या तपासाचा मुख्य आधार विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' असून, तो सुदैवाने सुरक्षित मिळाला आहे. त्यामध्ये रेकॉर्ड झालेले वैमानिकाचे शेवटच्या क्षणांचे संभाषण आणि विमानाचा तांत्रिक डेटा यातून विमानाचे इंजिन हवेत असतानाच निकामी झाले होते का, याचे उत्तर मिळणार आहे. याशिवाय, ज्या खासगी कंपनीकडे विमानाची जबाबदारी होती, त्या 'VSR व्हेंचर्स' ने विमानाची वेळेवर आणि योग्य प्रकारे देखभाल केली होती का? की यामागे काही तांत्रिक हलगर्जीपणा होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या अहवालातून समोर येतील. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा सत्य वृत्तांत समोर येण्यासाठी आता काही तासांचीच प्रतीक्षा उर्ती आहे


आमदार रोहित पवार यांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणातील ठोस पुरावे समोर आणण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सीआयडी (CID) या प्रकरणाचा समांतर तपास करत असून तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे. आज सायंकाळी येणाऱ्या तांत्रिक अहवालाच्या आधारावरच या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचा एफआयआर (FIR) दाखल करायचा की नाही, याचा अंतिम निर्णय सीआयडी घेणार आहे. त्यामुळे या तांत्रिक अहवालाकडे आता केवळ प्रशासनाचेच नव्हे, तर राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.



VSR व्हेंचर्स'ला मोठा दणका


विमान अपघातानंतर केलेल्या विशेष ऑडिटमध्ये सुरक्षिततेच्या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. याची तातडीने दखल घेत DGCA (नागरी विमान वाहतूक संचालनालय) ने संबंधित विमान कंपनीची उर्वरित पाचही विमाने तूर्तास 'ग्राऊंडेड' केली आहेत, म्हणजेच त्यांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. कंपनीच्या कामकाजातील या उणिवांमुळे संशयाची सुई आता व्यवस्थापनाकडे वळली आहे. अशा परिस्थितीत, आज सायंकाळी येणारा तांत्रिक तपास अहवाल हा केवळ अपघाताचे कारणच स्पष्ट करणार नाही, तर या कंपनीसाठी आणि संपूर्ण तपासासाठी एक 'टर्निंग पॉईंट' ठरणार आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण