महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.नाममात्र सदस्यांना मर्यादेपेक्षा अधिक कर्ज दिल्याचा ठपका बँकेवर ठेवण्यात आला आहे. याशिवाय ज्या कर्जदारांना दंड लावला त्याची माहिती न दिल्याचा ठपका बँकेवर ठेवला गेला आहे.


द प्रकाशपुरम को-ऑपरेटिव्ह अर्बन को ऑपरेटिव्ह लिमिटेड, तामिळनाडू ५० हजार रुपयांचा दंड आरबीआयनं केला आहे. बँकेनं लाभांश वाटपासंदर्भात नियम न पाळल्याचा ठपका ठेवला आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं द बेळगा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कर्नाटक या बँकेला २ लाख रुपये दंड केला आहे. या बँकेला संचालकांच्या कर्जाप्रकरणी आणि इतर कारणांसाठी दंड करण्यात आला.


द गुंटूर महिला सहकारी नागरी बँक मर्यादित, आंध्र प्रदेशला ५० हजार रुपयांचा दंड करणयात आला आहे. आरबीआयच्या केवायसी संदर्भातील नियमांची पूर्तता न केल्यानं दंड करण्यात आला.



द महबूबनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड तेलंगणा या बँकेला आरबीआयनं १ लाख रुपयांचा दंड केला आहे. या बँकेनं देखील संचालकाला कर्ज मंजूर केल्याचं आढळून आल्यानं आरबीआयनं ही कारवा केली.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी