राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) 'प्रचंड'मधून उड्डाण केले आणि एक फेरी मारली. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्यासोबत त्यांनी उड्डाण केले.


भारताचे हवाई दल राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण परिसरात वायुशक्ती नावाने कवायती करत आहे. या मोहिमेत भारताचे हवाई दल सामर्थ्याची चाचपणी करणार आहे. या कवायतींच्या पाहणीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग पोखरणमध्ये आहेत.


भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात युद्धाभ्यास करणार आहे. हवाई दलाच्या या कवायतीत ७७ लढाऊ विमानं, ३४ हेलिकॉप्टर, ८ मालवाहक विमानं यांचा ताफा सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दल करणार असलेल्या 'ऑपरेशन वायुशक्ती'मध्ये राफेल, सुखोई, मिराज-२०००, मिग-२९, जग्वार आणि तेजस आदी लढाऊ विमानांचा ताफा सहभागी होणार आहे. यंदाचे 'ऑपरेशन वायुशक्ती' हे ऑपरेशन सिंदूरच्या यशाला नव्याने उजाळा देणार आहे. हवाई वर्चस्व स्थापन करणे, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा सुयोग्य वापर करणे, विविध संरक्षण दलांशी समन्वय राखून मर्मभेदी असा हल्ला हल्ला करणे आदी सराव या निमित्ताने होतील. भारतीय हवाई दल देशांतर्गत आणि परदेशातील संघर्षग्रस्त भागातून वेगाने लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याच्या कारवाईचाही सराव करणार आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि