RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत आहेत. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पाऊले उचलली आहेत. याबाबत नितीन गडकरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे.



ड्रायव्हिंग लायसन्स बनेल ‘रिपोर्ट कार्ड’


नव्या योजनेनुसार प्रत्येक चालकाच्या लायसन्सवर गुण प्रणाली (पॉइंट्स सिस्टिम) लागू केली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकाच्या लायसन्सवरील ठराविक गुण कमी केले जातील. जर हे गुण ठराविक मर्यादेपेक्षा खाली गेले, तर चालकाचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. म्हणजेच त्या कालावधीत वाहन चालवण्यास बंदी असेल.



वारंवार चुका केल्यास कायमस्वरूपी रद्द


गंभीर नियमभंग किंवा वारंवार केलेल्या उल्लंघनांवर अधिक कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकरणांत संबंधित व्यक्तीचे लायसन्स कायमचे रद्द करण्याची तरतूदही असणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना पुन्हा परवाना मिळवणे कठीण होऊ शकते.



या उल्लंघनांवर कारवाई ठरणार कठोर


खालील प्रकारच्या चुका वाहनचालकांना महागात पडू शकतात:


वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवणे
वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर
चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालवणे
मद्यपान करून वाहन चालवणे

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी