उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन नक्कीच सकारात्मक विचार करेल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.


राज्यातील शासन मान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी पवित्र पोर्टलप्रमाणे निर्माण करणार का असा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नास उत्तर देताना ते बोलत होते.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शासन मान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी भरती प्रक्रिया करताना आठ सदस्यांचे मुलाखत पॅनल असते. या मुलाखत पॅनलमधील सदस्यांनी गुण द्यायचे असतात. यामध्ये संचालकाचा सहभाग ना हरकत देण्यापुरताच असतो. प्रत्येक पॅनलमधील दिलेल्या सदस्याचे गुण एकत्रित करून विद्यापीठाला कळविले जातात. विद्यापीठाने त्याला मान्यता द्यायची असती. मात्र तरीही शिक्षण विभागाप्रमाणे अथवा त्यापेक्षा सुधारित भरती प्रकिया करण्यासाठी सूचना आली आहे त्याच्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग नक्की विचार करेल असे उत्तर त्यांनी दिले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने