BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईचा आढावा घेत त्या भागांना प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर तसेच महापालिका सभागृहात फेरीवाला माफियांविरोधात नगरसेवकांकडून कारवाईची मागणी केल्यानंतरही दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना हटवण्यात महापालिकेला अपयश येत आहे. महापालिका आणि पोलिस यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात कारवाई करणारे पथक पुढे निघून गेल्यानंतर स्थानक परिसरातच मोठ्याप्रमाणात फेरीवाले व्यवसाय करत असल्याने आता या फेरीवाल्यांना महापालिका आणि पोलिसांची भीतीच वाटत नाही की चिरीमिरी दिल्यामुळे पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी केवळ कारवाईचे नाटक करून त्यांना व्यवसाय करण्यास देत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.


मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी फेरीवाल्यांसह अतिक्रमण हटवण्याची जी मोहिम हाती घेतली आहे, त्याचे परिणाम आता मुंबईत दिसून येत आहे. त्यामुळेच सुरुवातीला या कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना सेवा निवृत्तीच्या एक महिना आधी का होईना या कारवाईचे समर्थन करत काही भाग फेरीवाला मुक्त केले जातील अशी घोषणा करावी लागली आहे. याचा आधार घेत महापालिका सभेत उबाठाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी फेरीवाला माफियाचा मुद्दा उपस्थित करून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते.


विशेष म्हणजे या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अधिक कडक तथा तीव्र होण्याची शक्यता असतानाही दादर रेल्वे स्थानक पश्चिम परिसराच फेरीवाले व्यवसाय करताना दिसत आहे. एवढेच नाही तर आवाज देत आपल्या वस्तूही विकत आहे. जावळे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, केशवसूत उड्डाणपूल तसेच रानडे मार्गावर हे चित्र आता रात्री आठनंतर उशिरापर्यंत दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे रेल्वे स्थानकापासून शंभर मीटरच्या पुढील बाजुस कडक कारवाई दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिस प्रशासन हे न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करते की अवमुल्यन करते असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिथे स्थानकापासून १०० मीटरच्या पुढील बाजुस कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना तिथे कडक कारवाई करताना दुसरीकडे रेल्वे स्थानकाच्या दरवाजात मात्र कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या कारवाईवर शंका उपस्थित होत आहे.



उबाठा नगरसेवकाच्या मागणीला विरोधी पक्षनेत्यांचा नाही पाठिंबा : 


फेरीवाला माफियावर कारवाई करण्याच्या मागणी उबाठाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी केली. हरकतीच्या मुद्दयाद्वारे यावर उबाठाने आवाज उठवलेला असतानाच त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या हरकतीच्या मुद्दयाला पाठिंबा दिला नाही किंबहुना समर्थनही केले नाही. एवढेच नाही तर सभागृहात उपस्थित विशाखा राऊत, सचिन पडवळ, रमाकांत रहाटे यांच्यासह कुणीच त्यावर भाष्य केले नाही. उलट फणसे यांच्या मागणीला भाजपने पाठिंबा दिला. सभागृहनेते गणेश खणकर यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवानंद शेट्टी, राखी जाधव, सुषम सावंत या भाजपच्या सदस्यांनी समर्थन केले, तर उबाठाच्या श्रध्दा जाधव आणि प्रमोद सावंत व्यतिरिक्त कुणीही तोंड उघडले नाही. तर काँग्रेसच्या अश्रफ आझमी, नसीमा जुनेजा यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादीच्या अजित रावराणे याचे समर्थन केले. परंतु, आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकाने मांडलेल्या हरकतीच्या मुद्दयाला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पाठिंबा देत एकप्रकारे फणसे यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला, पण भाजपने त्यांना सावरत राष्ट्रभक्त नागरिक म्हणून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या या केवळ आपल्याच मर्जीतील नगरसेवकांची बाजू लावून धरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने