मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन मंडळाने बदल केले आहेत. प्रवाशांच्या गरजेनुसार बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाने बससेवेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी प्रवासी असलेल्या थांब्यांवरील सेवा कमी करून गर्दीच्या मार्गांवर बसच्या फेऱ्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय काही मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरु करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरांतील काही मार्ग व थांब्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून हे बदल १ मार्चपासून लागू होणार आहेत.



मार्गांमध्ये करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे आहेत : 


ए ६ बस आता बॅकबे आगाराऐवजी कुलाबा आगारापर्यंत धावेल.

ए २२ मार्ग विजय वल्लभचौकऐवजी जिजामाता उद्यान ते मजास आगारदरम्यान चालवला जाईल.

मार्ग ६९ वडाळा आगाराऐवजी शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे संपेल.

ए ५१५ सेवा सिप्झ गावाऐवजी सिप्झ बस स्थानकापर्यंत मर्यादित राहील.

ए १ मार्गातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रुझ डेपोदरम्यान धावणारी ही बस वांद्रे रिक्लेमेशन आणि वांद्रे पश्चिम बस स्थानकाचा वळसा टाळून माहीम कोळीवाडा ते वांद्रे टॉकीजदरम्यान स्वामी विवेकानंद रोडमार्गे थेट धावेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.

ए १०१ मार्गाचा विस्तारही करण्यात आला आहे.

सध्या सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणारी ही बस आता महात्मा फुले मंडईपर्यंत जाईल. परतीचा मार्ग डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकातून असेल. यामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना अधिक सोय होणार आहे.

याशिवाय काही मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरू केली जाणार आहे.

ए २०३ (आरसी चर्च – कमला नेहरू उद्यान),

ए ३२४ (शास्त्री नगर – चांदिवली बस स्थानक),

ए ३२६ (अंधेरी स्थानक पश्चिम – मिल्लतनगर),

ए ३४६ (अंधेरी स्थानक पश्चिम – रमेश नगर),

ए ३५४ (अंधेरी स्थानक पश्चिम – वीरा देसाई मार्ग विस्तारित),

ए ३८१ (माहुल गाव – कुलाबा बस स्थानक)

ए ४१२ (माजगाव आगार – मुंब्रा फाटा, ठाणे) या मार्गांवर एसी बस उपलब्ध होणार आहेत.

प्रशासनाने कोणताही मार्ग पूर्णपणे बंद केलेला नसून प्रवासीसंख्येनुसार फेरबदल केले असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या व्यवस्थेमुळे सेवा अधिक कार्यक्षम आणि जलद होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर