Food delivery staff : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची

मुंबई : राज्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांना यापुढे कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक राहणार असून, ज्या कंपन्या हा नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी शनिवारी विधानसभेत दिला.


भाजप आमदार भिमराव तापकीर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, "राज्यातील झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो, अमेझॉन आणि इतर ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या वितरण कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची करण्यासाठी शासन काही परिपत्रक काढणार आहे का? पोलीस पडताळणी न करता कर्मचारी ठेवले गेले तर संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल का? तसेच, ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ मागवल्यास संबंधित अॅपवर वितरण कर्मचाऱ्यांची माहिती ग्राहकांना दिसण्यासाठी काही आदेश दिले जातील का?" असे प्रश्न त्यांनी विचारले.


यावर उत्तर देताना मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, "ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असताना जाहिरात देऊन त्रयस्थ संस्थेमार्फत त्यांची नोंदणी करतात. ऑनलाईन अर्जच्या माध्यमातून ही नोंदणीची प्रक्रिया केली जाते. पार्टनरशिपच्या नावावर त्यांचा हा करार होत असतो. या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया त्रयस्थ संस्थांमार्फत होत असल्याने कंपन्या स्वत:वरची जबाबदारी झटकताना दिसतात. परंतु, मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घटनांनंतर गृहविभागामार्फत काही सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यावेळी या कर्मचाऱ्यांची चारित्र्य तपासणी करण्याबाबत कामगार विभागाने गृह विभागाला सुचित केले."



पोलिसांकडून पडताळणी सुरू :


मंत्री फुंडकर म्हणाले, "सध्यातरी सगळ्या कंपन्या पोलीस पडताळणी करत आहेत. तरीसुद्धा येणाऱ्या काळात सर्व आस्थापनांना सुचित केले जाईल की, पोलीस पडताळणी केल्याशिवाय कामगारांना नोंदवू नये. असा कामगार आढळल्यास त्याला कामावरून कमी करण्यात यावे. तसेच, ज्या कंपन्या नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असेही मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर