Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा एप्रिल २०२६ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे राज्य सरकारने विधानपरिषदेत स्पष्ट केले. आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर झालेल्या चर्चेत भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मेट्रो कामातील विलंब आणि वाढत्या खर्चाबाबत प्रशासनाला प्रश्न विचारला.


चर्चेदरम्यान प्रवीण दरेकर यांनी प्रकल्पातील त्रुटींकडे लक्ष वेधले. "मेट्रो-४ प्रकल्पाची मूळ मुदत जुलै २०२१ होती, जी आता ऑगस्ट २०२६ पर्यंत पुढे गेली आहे. या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च १२७४ कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच, मुलुंड आणि घाटकोपर येथील दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे," असे दरेकर यांनी नमूद केले. कांजूरमार्ग कारशेडच्या जागी मोगरपाडा (ठाणे) येथे कारशेड हलवल्याने कामाच्या गतीवर झालेला परिणाम लक्षात घेता, हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.


यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मेट्रो-४ च्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या कामाचे सविस्तर नियोजन सभागृहासमोर ठेवले. त्यांनी सांगितले की, "मेट्रो-४ प्रकल्पाचा फेज-१ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर फेज-२ डिसेंबर २०२६ पर्यंत आणि अंतिम फेज-३ नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे." तांत्रिक अडचणी आणि कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता कामाला वेग आला असून, मुंबईकर आणि ठाणेकरांना लवकरच या आधुनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळेल, असे सकारात्मक उत्तर सरकारने दिले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने