चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले. दरम्यान शनिवारी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी घडलेल्या या दुर्घटना स्थळी महापौर रितू तावडे यांनी तातडीने भेट दिली. तसेच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची विचारपूसही त्यांनी केली.


आदित्य राज या विकासकामार्फत इमारत बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीत सातव्या मजल्याचे काम सुरू असताना परांची कोसळून ही दुर्घटना घडली. या अपघातात सहा जण खाली कोसळले. त्यापैकी एका मजुराचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर अन्य पाच जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मजूर नेमके कसे कोसळले, याची माहिती घेतली असता या बांधकाम स्थळी अतिशय निष्काळजीपणा करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. अशा प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. कायद्याअंतर्गत कामगारांना सर्व प्रकारच्या सुरक्षा साधनांचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच कार्यस्थळावर अभियंता वर्गाच्या देखरेखीखाली काम होणे आवश्यक आहे. अपघात झाला, तेव्हा अभियंता कुठे होता? यासह विविध बाबी तपासणी गरजेचे आहे, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.


या दुर्घटनेबाबत प्राथमिक माहिती घेतली आहे. त्यानुसार, बेजबाबदारपणे काम करणाऱ्या विकासक आणि कंत्राटदार यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका व म्हाडा प्राधिकरणाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही निर्देशही महापौर रितू तावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.


या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी महापौर रितू तावडे या राजावाडी रुग्णालयात पोहचल्या. उपचार सुरू असलेलया पाच पैकी एका मजुराची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जखमी सर्व रुग्णांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत, असे महापौरांनी नमूद केले. यावेळी उप महापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर हे उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन