Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गर्भाशयातील साधी गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करायला गेलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे डॉक्टरांनी तिची कोणतीही संमती नसताना थेट गर्भाशयच काढून टाकले. याप्रकरणी मांजरी पोलिसांनी साई केअर हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.



नेमकं घडलं काय?



तक्रारदार महिलेच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे २०२३ मध्ये सोनोग्राफी अहवालात समोर आले होते. उपचारासाठी त्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरीतील साई केअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांना लेझर शस्त्रक्रियेद्वारे केवळ गाठ काढावी लागेल, असे आश्वासन दिले होते. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि १७ सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले.



तपासणीत धक्कादायक सत्य समोर



शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी महिलेला शारीरिक त्रास जाणवू लागला. त्या पुन्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या असता, डॉक्टरांनी गाठ काढण्याऐवजी संपूर्ण गर्भाशयच काढून टाकल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेपूर्वी महिलेने केवळ गाठ काढण्याची परवानगी दिली होती, गर्भाशय काढण्याबाबत कोणतीही संमती दिलेली नव्हती. याबाबत डॉक्टरांना जाब विचारला असता, त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.


याप्रकरणी पीडितेने मांजरी पोलीस ठाण्यात पोलिसांनी डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब) आणि ३ (५) अन्वये निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी