अमेरिका - इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा भारतीय शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम, सेन्सेक्स २७०० अंकांनी घसरला, निफ्टी २४ हजार ७०० च्या खाली गेला

मुंबई : अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लढाईला सुरुवात झाली आहे. या लढाईचा प्रतिकूल परिणाम भारतासह जगभरच्या शेअर बाजारांवर झाला. भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार २ मार्च रोजी सकाळी धाडकन कोसळला. सेन्सेक्स २७०० अंकांनी घसरला तर निफ्टी २४ हजार ७०० च्या खाली गेला. निप्टी फिफ्टी हा ५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला.


सेन्सेक्स २,७४३ अंकांनी घसरून ७८,५४३ वर उघडला, तर निफ्टी फिफ्टी हा ५१९ अंकांनी घसरून २४,६५९ वर उघडला. या तीव्र घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलातील ७.८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बुडाली.


सेन्सेक्समध्ये इंडिगो, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), इटरनल, अदानी पोर्ट्स आणि एशियन पेंट्स हे सर्वाधिक घसरणीचे शेअर्स होते, जे २ ते ४ टक्के या प्रमाणात घसरले. भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स एक टक्क्यापेक्षा जास्त वाढले. एनएसईवरील क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी रिअॅलिटी सर्वाधिक घसरणीचे शेअर्स होते, जे सुमारे २ टक्के घसरले, तर निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी ऑइल अँड गॅस हे प्रत्येकी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले.


कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किमती ६ टक्के वाढवून प्रति बॅरल ७७.०८ डॉलर वर पोहोचली. WTI क्रूड ५.५ टक्के वाढून ७०.७१ डॉलरवर पोहोचले. रुपयाच्या विनिमयाच्या दरात घसरण झाली. एका डॉलरसाठी आता ९१ रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी या संकटातही शेअर खरेदीवर भर ठेवला. भारतातल्या संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या या संकटात तग धरून असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण