दुबईत अडकलेल्या मराठी जनांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिला आधार


दुबईतील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या मदतीने सर्वांपर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्न


मुंबई :- इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने त्याचा फटका आखाती देशांनाही बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील नागरिक हे दुबईत अडकून पडले आहेत. या नागरिकांना शक्य ती मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.


या युद्धामुळे ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर अशा विविध भागातून दुबईला गेलेल्या नागरिकांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क केला. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टेडीजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या महाविद्यालयाचे ८४ विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दुबईतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी त्यांना धीर दिला. या कठीण परिस्थितीत हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून तुम्हाला सुखरूपपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न नक्की केले जातील असे शिंदे यांनी सांगितले.


तसेच तिथे अडकलेल्या इतर नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. आपण कोणतीही चिंता करून नका, जिथे आहात तिथे आपल्याला काही कमी पडू नये यासाठी शक्य ती सारी मदत देण्याचे प्रयत्न बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी त्यांना सांगितले.


तसेच महाराष्ट्र शासन आणि उपमुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून तुम्हाला सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले जातील असे सांगून शिंदे यांनी या नागरिकांना आश्वस्त केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन