उत्तर महाराष्ट्रात उबाठाची 'मशाल' विझली

माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेच्या वाटेवर; ६ मार्चला मुंबईत पक्ष प्रवेश होणार


मुंबई : राजकारणात 'मैत्री' आणि 'शत्रुत्व' यापेक्षा 'संधी'ला किती महत्त्व असते, याचा प्रत्यय जळगावच्या राजकारणाने पुन्हा एकदा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील 'उबाठा' गटाचा प्रमुख चेहरा आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' ठोकण्याचा निर्णय घेतला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ते प्रवेश करणार आहेत. येत्या शुक्रवारी (६ मार्च) मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार असून, जळगावच्या राजकारणात 'गुलाबराव-उन्मेष' ही नवी युती काय चमत्कार घडवते, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.


२०१९ मध्ये भाजपकडून ४ लाखांच्या विक्रमी मताधिक्याने खासदार झालेल्या उन्मेष पाटलांचा राजकीय प्रवास गेल्या दोन वर्षांत मोठ्या वळणांवरून गेला आहे. २०२४ मध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी तडकाफडकी 'मातोश्री'वर धाव घेत हाती मशाल घेतली होती. मात्र, त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा सत्तेच्या प्रवाहात सामील होणे पसंत केले आहे. दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या 'घरवापसी'वर शिक्कामोर्तब झाले.


गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय होती. एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि विकासाचा वेग हीच आपल्या पक्षप्रवेशाची प्रेरणा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण