राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा


मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्र सरकारने 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने'अंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्रासाठी १ हजार १६८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील चौथ्या हप्त्याच्या स्वरूपात हे अनुदान प्राप्त झाले असून, यामुळे अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


गेल्या काही महिन्यांपासून राज्यात 'मनरेगा'अंतर्गत काम करणाऱ्या अकुशल कामगारांची मजुरी थकीत होती. सुमारे ६७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील श्रमिक आर्थिक कोंडीत सापडले होते. 'होळी'च्या सणापूर्वी हा निधी मिळावा, अशी मागणी जोर धरत होती. केंद्राच्या या निर्णयामुळे थकीत मजुरीसह पुढील कामांसाठीही मोठा निधी उपलब्ध झाला आहे.


श्रमिकांच्या हिताचा विचार


श्रमिकांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने २०२५-२६ या वर्षासाठी १ हजार १६८ कोटी रुपयांचा चौथा हप्ता मंजूर केला आहे. याचा सर्वाधिक फायदा आमच्या आदिवासी, अनुसूचित जाती आणि ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना होईल. सणासुदीच्या काळात हा निधी ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार देणारा ठरेल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


ग्रामीण विकासाला गती


'मनरेगा' हा ग्रामीण भागातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे. केंद्राकडून प्राप्त झालेल्या या निधीमुळे नवीन कामांना मंजुरी मिळणे सोपे होणार आहे. विशेषतः दुष्काळी आणि दुर्गम भागातील मजुरांना वेळेवर वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार