Israel - Iran War : इराण-इस्रायल युद्धात मुंबईकर तरुणाचा मृत्यू, २५ वर्षीय दीक्षितचा ड्रोनने घेतला बळी

मध्य-पूर्वेतील महायुद्ध सुरु होऊन ५ दिवस झाले असून याची झळ आता भारतालाही बसली आहे. या युद्धात भारताच्या २५ वर्षीय दीक्षितचा ड्रोनने बळी घेतला आहे. ओमानच्या किनारपट्टीवर मस्कतजवळ एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या दीक्षित सोलंकी याचा मृत्यू झाला आहे.


मूळचा दीवचा असलेला २५ वर्षीय दीक्षित सोलंकी काही काळापूर्वी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाला होता. तो मुंबईतील कांदिवली भागात वास्तव्यास होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून ५२ नॉटिकल मैलांवर 'MKD Vyom' या ऑईल टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने धडक दिली. या भीषण स्फोटात टँकरच्या इंजिन रूमला आग लागली आणि त्यात दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.


दीक्षित हा दीवमधील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सो25-year-oldलंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिनाभरापूर्वीच आईच्या निधनानंतर तो गावी आला होता आणि पुन्हा कर्तव्यावर परतला होता, मात्र काळाने त्याच्यावर झडप घातली.



भारतीय दूतावासाकडून दुःख व्यक्त :


ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोलंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील इतर २५ क्रू मेंबर्सची (ज्यात १६ भारतीय होते) सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने