पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे. वनाझ–रामवाडी मार्गिकेचा विस्तार करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, कल्याणीनगरमार्गे विमानतळाशी जोडणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.



सहा पर्यायांतून कल्याणीनगर स्पर लाईनची निवड


बैठकीत सादर करण्यात आलेल्या विविध पर्यायांपैकी महामेट्रो कडून सुचवलेल्या कल्याणीनगर स्पर मार्गाला प्राधान्य देण्यात आले. या चर्चेला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. नव्या आराखड्यानुसार मेट्रो कल्याणीनगर स्थानकानंतर सिम्बायोसीस परिसरातून पुढे जात विमानतळाजवळील एरोमॉलपर्यंत धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना थेट टर्मिनलजवळ उतरता येणार आहे.



संरक्षण हद्दीचा अडथळा टळला


यापूर्वी विमानतळ जोडणीसाठी विचारात घेतलेल्या मार्गांमध्ये संरक्षण खात्याच्या जमिनींचा प्रश्न निर्माण होत होता. नव्या पर्यायात मेट्रो सार्वजनिक रस्त्यांच्या ‘राईट ऑफ वे’मधून नेण्याचा प्रस्ताव असल्याने मोठ्या भूसंपादनाची गरज भासणार नाही. प्रकल्पासाठी मर्यादित जागेचे अधिग्रहण अपेक्षित असून, परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया तुलनेने सुलभ राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



प्रवाशांना थेट फायदा


रामवाडी किंवा परिसरातून विमानतळासाठी वेगळा रस्ता निवडण्याची गरज कमी
ट्रॅफिकमुळे होणारा उशीर आता होणार नाही
विमानतळावर पोहोचण्यासाठी पूर्वीप्रमाणे अनेक तास आधी निघावे लागणार नाही
कार्यालयीन आणि व्यावसायिक प्रवाशांचा मेट्रोमुळे खूप वेळ हा वाचणार आहे.


विस्तारित मार्गाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल लवकरच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे सादर केला जाणार आहे या मंजुरीनंतर आर्थिक आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू होईल.



पुढचे नियोजन


लवकरच या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) पुणे महानगरपालिकेला सादर करणार आहे. यासोबतच वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांच्या कामालाही लवकरच गती मिळणार आहे. तसेच शहराच्या वाढत्या विस्तारासाठी शेवाळेवाडी-कात्रज-वाकड फाटा असा महामार्गाला समांतर मेट्रो मार्गही नियोजित आहे.



शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम


विमानतळाशी थेट मेट्रो जोडणी ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी होती. नव्या निर्णयामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला धोरणात्मक बळ मिळणार असून, वाढत्या नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.


Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि