'अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करावी'

मुंबई : अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.


अमरावती शहरालगत असलेल्या हनुमान गढी परिसरात पर्यटकांच्या सुविधांची कामे आधी पूर्ण करावी. ही कामे दर्जेदार असावीत. या पर्यटन केंद्राचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम पूर्ण करावे. संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान दिले.


बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हनुमान गढी परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी सुविधा कामांना प्राधान्य द्यावे. या विकास आराखड्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. हनुमान गढी स्थळाच्या विकासानंतर हे ठिकाण अमरावती शहरालगत पर्यटकांसाठी पर्यटन केंद्राची पर्वणी ठरणार आहे.


तसेच नागपूर शहरातील महाल परिसरात असलेल्या पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराचा विकास करताना पार्किंग महत्वाचे ठरणार असून या परिसरात पार्किंगची व्यवस्था उभारण्यात यावी. मोठ्या संख्येने वाहनांची पार्किंग होईल, अशा पद्धतीने करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


असा आहे विकास आराखडा


हनुमान गढी परिसर विकास करताना 17 हजार 671 चौरस मीटर क्षेत्रावर विविध विकासकामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याठिकाणी अयोध्येतील राम मंदिर यज्ञ मंडपाच्या प्रतिकृतीवर आधारित यज्ञ मंडप, ॲम्फीथिएटर, यज्ञशाळा, फूड मॉल, क्राफ्ट सेंटर , आखाडा, महाप्रसाद हॉल, बहुउद्देशीय सभागृह, प्रशासकीय इमारत, हनुमान गॅलरी, दिव्यांग स्नेही रस्ता, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाची व्यवस्था राहणार आहे. तसेच संपूर्ण परिसरात संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, मुख्य प्रवेशद्वार, हनुमान मूर्तीवर लेझर शो ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म