कोल्हापूरमध्ये ३४.३६ हेक्टरवर होणार आयटी पार्क

मुंबई : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव आणला. यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


महसूल विभागाच्या प्रस्तावानुसार शेंडापार्क परिसरातील गट क्रमांक ५८३, ५८७ आणि ५८८ मधील एकूण ३४.३६ हेक्टर जागा आयटी पार्क विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क उभारण्याची योजना असून त्यातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे.


राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याबरोबरच पुणे-मुंबईसारख्या शहरांबाहेरही आयटी क्षेत्राचा विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल. यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आयटी, सेवा आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून परिसरात रोजगारासह मोठी आर्थिक उलाढाल होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म