Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी एका विद्यार्थ्याला चोप दिला आहे. संबंधित विद्यार्थी मागील १५ दिवसांपासून पीडित तरुणीचा ऑनलाईन छळ करत होता. मुलीसोबत घडणारा प्रकार समजल्यानंतर वडिलांनी कॅम्पसमध्येच गाठून तरुणाला चांगलाच चोप दिला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.



नेमकं काय घडलं?



मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेते. पुण्यातीलच डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजचा एक विद्यार्थी गेल्या १५ दिवसांपासून या तरुणीला ऑनलाईन माध्यमातून सातत्याने त्रास देत होता. तिचा पाठलाग करत होता. वारंवार होणाऱ्या या मानसिक छळामुळे तरुणी अत्यंत त्रस्त झाली होती. अखेर तिने ही गोष्ट धीराने आपल्या वडिलांना सांगितली.


मुलीसोबत घडणारा प्रकार ऐकून वडिलांना संताप अनावर झाला. त्यांनी आरोपी मुलाला धडा शिकवायचं ठरवलं. ते आपल्या मुलीसोबत कॉलेजला आले. यावेळी संबंधित हुल्लडबाज विद्यार्थी पुन्हा या कॉलेज परिसरात आला. मुलीची छेड काढताना वडिलांनी त्याला रंगेहाथ पकडलं. सुरुवातीला वडिलांनी त्याला समजावण्याचा आणि जाब विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्या विद्यार्थ्याने उद्दामपणा केल्याने वडिलांचा संयम सुटला. संतापलेल्या वडिलांनी त्या हुल्लडबाजाला कॅम्पसमध्येच लोळवले आणि चांगलाच चोप दिला.



कॅम्पसमध्ये मोठा राडा



हा प्रकार सुरू असताना दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. कॉलेजच्या आवारातच हा प्रकार घडल्याने इतर विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांची मोठी गर्दी जमली होती. या सर्व गर्दीसमोरच तरुणीच्या वडिलांनी तरुणाच्या अंगावर बसून त्याला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा प्रकारे बाहेरील विद्यार्थी येऊन तरुणींना त्रास देत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी