'वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप मागे घेतला'

मुंबई : अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य व्यापी वाहतूकदारांच्या संपा संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली . तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ' महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन ' कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने शासन विचार करित आहे, तरी संप मागे घ्यावा असे आवाहन केले. त्या आव्हानाला प्रतिसाद देत वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. तसेच , शासन वाहतुकदारांच्या विविध मागण्या संदर्भात संवेदनशील असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले . अन्यायकारक पद्धतीने काढण्यात आलेल्या इ-चलानांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल तसेच संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग व पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या आश्वासनानंतर वाहतूकदारांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या