Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. आई हा अखेरचा संवाद असे म्हणत मुलाने आपल्या जन्मदातीला कॉल केला अन् गळफास घेत आयुष्य संपवले. ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.



आई हा शेवटचा कॉल..


याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाण्याच्या करडीमध्ये एका तरुणाने आईला कॉल करुन त्यांच्या डोळ्यादेखत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत एकनाथ सपकाळ वय वर्ष ३९ यांचे धाड येथील भाग १, गट क्र. ५७ मध्ये शेत आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचे सांगितले. आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे...' असं ते आईला कॉलवर बोलले.


मुलाचे हे शब्द ऐकताच आईच्या पोटात गोळा आला. आपला लेक काहीतरी विपरित पाऊल उचलतोय हे त्यांच्या लक्षात आले अन त्यांनी दुसऱ्या मुलासह शेताकडे धाव घेतली. ते शेतात पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. समोरून आई आणि भाऊ येताना दिसताच, ज्ञानेश्वर यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन उडी घेतली. काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली. आई आणि भावाच्या डोळ्यादेखत हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला.



आई आणि भावाच्या डोळ्यादेखत आत्महत्या


या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करत आहेत.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी