महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होणार

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून ते जनतेसाठी काय घोषणा करतात याकडे अनेकांचे लक्ष आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजना आदी कल्याणकारी योजना नव्या आर्थिक वर्षात सुरू राहणार का या संदर्भातील घोषणाही मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे.


राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्था असून कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांची वैविध्यपूर्ण रचना हा तिचा आधार आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर्स आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांत झालेल्या भरीव गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग प्राप्त झाला आहे. व्यवसाय सुलभता, डिजिटल प्रशासनास प्रोत्साहन आणि क्षेत्रविशिष्ट वाढीस चालना यासारख्या सुधारणांमुळे राज्याची स्पर्धात्मक क्षमता वृध्दिंगत झाली आहे.


सलग पाचव्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहील असा अंदाज असून, चालू आर्थिक वर्षात ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२५-२६ च्या पूर्वानुमानानुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन २०२४-२५ च्या तुलनेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२५-२६ मध्ये 'कृषि व संलग्न कार्ये', 'उद्योग' व 'सेवा' या क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धिमध्ये अनुक्रमे ३.४ टक्के, ५.७ टक्के व ९.० टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन २०२५-२६ मध्ये सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ ५१,००,५९७ कोटी अंदाजित असून वास्तविक (सन २०११-१२ च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ २८,८२,६९९ कोटी अंदाजित आहे.


पहिल्या सुधारित अंदाजांनुसार, सन २०२४-२५ मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा सर्वाधिक (१४.० टक्के) आहे. सन २०२५-२६ च्या पूर्वानुमानानुसार, राज्याचे दरडोई उत्पन्न ₹ ३,४७,९०३ अंदाजित असून अखिल भारताकरिता ते ₹ २,१९,५७५ अपेक्षित आहे. पहिल्या सुधारित अंदाजांनुसार, सन २०२४-२५ चे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ₹४६,२२,१३८ कोटी अंदाजित आहे, तर दुसऱ्या सुधारित अंदाजांनुसार सन २०२३-२४ मध्ये ते ₹ ४१,१८,३७५ कोटी अपेक्षित आहे. सन २०२४-२५ चे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न ₹ २६,७१,३६१ कोटी अंदाजित असून सन २०२३-२४ मध्ये ते ₹ २४,८८,५६० कोटी अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने