Sukhoi Su-30 MKI Crashes: Su-30MKI विमान अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद

दिल्ली: आसामच्या दाट जंगलात बेपत्ता झालेल्या त्या 'सुखोई-३०' विमानाबाबतची भीती अखेर खरी ठरली आहे. तासनतास सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर भारतीय वायूसेनेने अत्यंत जड अंतःकरणाने एक दुःखद बातमी दिली. या भीषण दुर्घटनेत भारतीय वायुदलाने हिरा गमावला. स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर या दोन तरुण वैमानिकांचा या दुर्घटनेत निधन झाल्याचं स्पष्ट केलं.



गुरुवारी संध्याकाळी सुखोई विमान रडारवरून अचानक गायब झालं आणि संपर्क तुटला, तेव्हा संपूर्ण देश त्यांच्या सुखरूप परतण्यासाठी प्रार्थना करत होता. मात्र, कार्बी आंगलाँगच्या डोंगराळ भागात विमानाचा ढिगारा सापडला. सुखोई 30 विमान डोंगरांमध्ये क्रॅश झाल्याची माहिती समोर आली. स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचंही निधन झालं आहे.


वायूसेनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली आणि त्यांचं निधन झालं. भारतीय वायूसेना या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी आहे."


गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास या विमानाने जोरहाट एअरबेसवरून उड्डाण केले होते. त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांतच, म्हणजे सायंकाळी ७.४२ वाजता विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. विमान नियोजित वेळेत परत न आल्याने हवाई दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली होती. रात्रभर चाललेल्या या मोहिमेनंतर चोकीहोला परिसरातील जंगलात विमानाचा ढिगारा सापडला.


विमान बेपत्ता झाल्यानंतर हवाई दलाने आणि लष्कराने शोध पथके घटनास्थळी रवाना केली होती. कार्बी आंगलाँगचा हा भाग अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ असल्याने शोध कार्यात अडचणी येत होत्या. मात्र, विमानाचा शोध लागल्यानंतर दोन्ही वैमानिकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हे विमान एका नियमित ट्रेनिंग मिशनवर असताना ही दुर्घटना घडली. विमानाचा रडारशी संपर्क नेमका कोणत्या कारणामुळे तुटला आणि हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणामुळे, याचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात