आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश


मुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये प्रशासकाची सत्ता असल्यामुळे त्यांनी आपल्या काळात महापालिकेच्या कारभाराची घडीच विस्कटून टाकली. आजही अनेक विभाग आणि खात्यांमध्ये कर्मचारी,अधिकारी,अभियंते यांची अनेक पदे रिक्त आहे. जर ही पदेच रिक्त असतील तर त्या विभागाचे, खात्याचे काम कसे होईल आणि आम्हा नगरसेवकांची कामे तरी कशी होतील असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केला. त्यामुळे आस्थापना खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करू नका असे निर्देश प्रशासनाला देत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी, त्यामुळे आता प्रत्येक खाते आणि विभाग याचा आढावा घेवून पदे भरण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी सदस्यांना दिले.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पी उत्तर विभागाच्या विभाजनानंतर न व्याने निर्माण झालेल्या पी पूर्व विभागाकरता नव्याने निर्माण केलेले प्रशासकीय अधिकारी व सहायक मुख्य पर्यवेक्षक या संवर्गातील हंगामी पदे पुढे चालू ठेवण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता उबाठाच्या नगरसेविका श्रध्दा जाधव यांनी परवाना विभागातील अनेक पदे रिक्त आहेत, अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. प्रशासकीय अधिकारी नाहीत. मागील चार वर्षांत अनेक कर्मचारी व अधिकारी सेवा निवृत्त झाल्यानंतर तिथे कुणाला बढती गेली नाही कि त्या रिक्त पदांवर कुणी नवीन भरती केली गेली नाही. त्यामुळे याची चौकशी करून ही पदे भरण्याचा प्रयत्न व्हावा अशी मागणी केली. तर यावर बोलतांना सभागृहनेते गणेश खणकर यांनी विभागांमध्ये दोन दुय्यम अभियंता एक कनिष्ठ अभियंता अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिकेच्य विविध आस्थापनांमधील किती कर्मचारी,अधिकारी सेवा निवृत्त झाले आणि किती पदे भरली याची माहिती घ्यायला हवी. एवढेच काय तर लेखापरिक्षण विभागात १ मंजूर पदे आहेत,पण सध्या केवळ ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. आज जलअभियंता, इमारत कारखाना विभागात कुणीही जायला तयार नाही. त्यामुळे ही परिस्थिती गंभीर आहे. तर भाजपचे प्रकाश दरेकर यांनी प्रशासनाची एवढी उदासिनका का सवाल करत मी ज्या प्रभाग समितीचा अध्यक्ष झालो आहे, तेथील प्रशासकीय कार्यालयांना प्रभारीच सहायक आयुक्त असल्याचे सांगितले. यावर झालेल्या चर्चेत यामिनी जाधव, डॉ सईदा खान यांनी भाग घेत महापालिकेतील रिक्त पदांबाबत आणि कामकाजावर होणाऱ्या परिणामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.


यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यासर्व खात्यांचा सखोल आढावा घेतला जाईल. स्थायी समितीच्या अखत्यारित महापालिका सचिव आणि मुख्य लेखापरिक्षक हे विभाग आहेत. १९९७ पासून मी नगरसेवक असून त्यातील दोन वर्षे सोडली तर स्थायी समिती सदस्य होतो. त्यावेळी तत्कालिन मुख्य लेखापरिक्षक हे स्थायी समिती सदस्यांना अर्थसंकल्प समजून सांगायचे. महापालिका सचिव विभागात अजेंडा वाटताना विभागाची त्रेधातिरपीट उडत आहे. त्यामुळे महापालिकेत आस्थापना खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसून यासाठी कडक पावले उचलावीच लागतील असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील