मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक असून रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉ़क नाही.


मध्य रेल्वे


कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर केवळ शनिवारी ब्लॉक असल्याने रविवारी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


पश्चिम रेल्वे


कुठे : माहीम – सांताक्रूझ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १ ते पहाटे ४.३० पर्यंत
परिणाम: ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल – सांताक्रूझदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. जलद लोकलच्या फलाटाअभावी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांत लोकल थांबा नसेल. तर, लोअर परळ, माहीम आणि खार रोड येथील फलाटाची लांबी कमी असल्याने दोन वेळा लोकल थांबा असेल. ब्लाॅकमुळे काही अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक नाही.


हार्बर मार्ग


कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा आणि पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्ला – सीएसएमटी आणि पनवेल – वाशी – पनवेल विभागांवर विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या