भाजप उत्तर-पश्चिम महिला मोर्चातर्फे ‘तिच्या पावलात शक्ती २०२६’चे आयोजन

एक हजारांपेक्षा जास्त माता-भगिनींचा महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’मध्ये सहभाग


मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित


मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला मोर्चातर्फे रविवारी ‘साडी वॉकाथॉन – तिच्या पावलात शक्ती २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एक हजारांपेक्षा जास्त माता-भगिनींनी उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला.


या कार्यक्रमासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते.


आज आगळावेगळा असा साडी वॉकाथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हजारो माता-भगिनींनी पारंपरिक साडी नेसून या वॉकाथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘तिच्या पावलात शक्ती’ हे ब्रीदवाक्य आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरले. महिलांचे आरोग्य, उत्साह आणि आपली संस्कृती यांचा हा अनोखा संगम पाहून अभिमान वाटल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी सांगितले.


हा कार्यक्रम भाजप उत्तर-पश्चिम जिल्हा मुंबई महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आला होता. वॉकाथॉनची सुरुवात सकाळी ६ वाजता आरे चेक नाका, वाघदेवी मंदिराजवळील युनिट १० मैदानातून झाली.

Comments
Add Comment

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर