मुंबईच्या नायर रुग्णालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई : मुंबईच्या नायर रुग्णालयाला ईमेलद्वारे धमकी मिळाली आहे. संध्याकाळी चार वाजता बॉम्बस्फोट करून रुग्णालय उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली आहे. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक तसेच बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाड घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. या तपासणीत बॉम्ब सापडला नाही. अखेर ई मेलद्वारे फक्त त्रास देण्याच्या हेतूने धमकी देण्यात आल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ई मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. धमकीचा मेल पाठवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


धमकी देऊन दहशत पसरवणे, अफवा पसरवून दहशत निर्माण करणे, दिशाभूल करणारी माहिती देऊन सार्वजनिक व्यवस्थेवर ताण निर्माण करणे हे गंभीर गुन्हे आहेत. नायर रुग्णालय प्रकरणी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला लवकरच शोधू आणि अटक करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

हिरो एक्स्ट्रीम 160आर 4व्ही आणि 250आरच्या अपडेटेड बाइक्स लाँच; किंमत जाणून घ्या...

दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारात 2026 मॉडेलची अपडेटेड हिरो एक्स्ट्रीम 160आर 4व्ही आणि अपडेटेड

Ekta Kapoor : "धर्माचं पालन करणं ही समस्या कधीपासून झाली?"; चित्रपटसृष्टीतील 'हिंदूफोबिया'वर एकता कपूर संतापली

टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या

गुजरात हादरले! भरूचमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 कामगारांचा जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

भरूच (गुजरात) : गुजरातच्या भरूच जिल्ह्यात एका रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला

Delhi mumbai expressway Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खातूश्यामजीच्या दर्शनासाठी निघालेल्या ८ भाविकांचा मृत्यू, ९ जण गंभीर जखमी

शनिवारी सकाळी राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेशातील (Madhyapradesh) खातूश्यामजी

Nashik : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड ! अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून फेटाळला

Nashik : राज्यभर चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या

Tech Addiction : लहान मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याची वेळ आलीय? सुप्रीम कोर्टाची केंद्राला मोठी नोटीस

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येक पालकाची एकच डोकेदुखी असते ती म्हणजे, "माझं मूल दिवसभर मोबाईल आणि सोशल मीडियावर काय