लवकरच बाजारात येणार Apple iPhone 18 Pro Max; जाणून घ्या 'या' नवीन फीचर्स बद्दल

मुंबई : Apple iPhone 17e नंतर आता Apple च्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची चर्चा सुरू झाली आहे. कंपनी लवकरच Apple iPhone 18 Pro  बाजारात लवकरच आणणार आहे. लॉन्चला अजून वेळ असला तरी काही रिपोर्ट्समधून या फोनच्या डिझाइन, कॅमेरा, बॅटरी आणि हार्डवेअरबद्दल काही माहिती समोर आली आहे.



फ्रंट डिझाइनमध्ये मोठा बदल 


रिपोर्टनुसार, यावेळी सर्वात मोठा बदल फोनच्या फ्रंट डिझाइनमध्ये दिसू शकतो. Face ID साठी लागणारे सेन्सर आणि हार्डवेअर डिस्प्लेच्या खाली बसवले जाऊ शकतात. जर असे झाले तर iPhone मध्ये सध्या दिसणारा Dynamic Island हटवला जाऊ शकतो.


त्याऐवजी सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वर डाव्या बाजूला छोट्या होल-पंच स्वरूपात दिसू शकतो. त्यामुळे स्क्रीन अधिक स्वच्छ आणि मोठी वाटेल.



एकूण डिझाइनमध्ये फारसा बदल नाही


काही रिपोर्ट्सनुसार फोनचा एकूण डिझाइन साधारण Apple iPhone 17 Pro सीरीजसारखाच असू शकतो. म्हणजेच बॉडी, मटेरियल आणि कॅमेरा मॉड्यूलच्या डिझाइनमध्ये मोठे बदल नसतील.



कॅमेरा आणि नवीन कलर ऑप्शन


फोनच्या मागील बाजूला कंपनी पूर्वीसारखाच ट्रिपल कॅमेरा सेटअप देऊ शकते, जो थोडा उभ्या कॅमेरा प्लॅटफॉर्मवर असेल.


याशिवाय Apple प्रो मॉडेल्ससाठी काही नवीन रंगांवरही काम करत असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये डीप पर्पल, बर्गंडी आणि कॉफी ब्राउन सारखे आपल्याला Apple iPhone 18 Pro मध्ये मिळू शकतात.


 कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. सध्या ही सर्व माहिती लीक रिपोर्ट्सवर आधारित असल्यामुळे या फीचर्सची खरी माहिती फोनच्या अधिकृत लॉन्चवेळीच समोर येईल.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये