Attack on Saudi Arabia : सौदी अरेबियावरील हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका

- भारतीय दूतावासाने दिली माहिती


इराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात निवासी भागात एक प्रोजेक्टाइल पडल्याने सुरुवातीला एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र रियाधमधील भारतीय दूतावासाने आज म्हणजेच सोमवार ९ मार्च रोजी स्पष्ट केले की या हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. तसेच त्यांनी सांगितले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आम्ही सौदी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत.



भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची :


यापूर्वी सौदी नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले होते की अल-खरज शहरात झालेल्या या घटनेत मृत्यू झालेल्या दोन जणांमध्ये एक भारतीय आणि एक बांगलादेशी नागरिक होता. मात्र आता भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.



काय सांगितले भारतीय दूतावासाने :


भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले, “काल संध्याकाळी अल-खरज येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.” दूतावासाने पुढे सांगितले, “कौन्सुलर अधिकारी वाय. साबिर काल रात्री अल-खरज येथे गेले होते आणि या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या भारतीय नागरिकाची त्यांनी भेट घेतली.” दूतावासाने पुढे माहिती दिली की सध्या त्या जखमी व्यक्तीवर अल-खरजमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, सौदी प्रवक्त्यांनी म्हटले की नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न हे आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे आणि अशा प्रकरणांमध्ये निर्धारित प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तसेच सौदी अरेबियाने निवेदन जारी करत सांगितले की इराणी हल्ल्यांमुळे देशात संताप वाढत आहे.दरम्यान, भारतीय दूतावासाने रविवारी आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली. यात नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करण्यास सांगितले आहे. दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “या प्रदेशातील आणि सौदी अरेबियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्या सौदी अरेबियामध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम