मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

मुंबई: आयसीसीच्या टि ट्वेंटी विश्वचषकाच्या सलग दोन स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरण्याची भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट आहे. ही कामगिरी आणि खेळी क्रिकेट जगत कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे या ऐतिहासिक विजयासाठी जिगरबाज भारतीय क्रिकेटपटूंचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.


'अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरवातीपासूनच जिगरबाज खेळी केली. संजू सॅमसन यांच्या सह फलंदाजांनी धुवांधार धावा काढल्या तर गोलंदाजानी कमाल दाखवली. अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला गारद केले. क्षेत्ररक्षणातही ईशांत किशन, तिलक वर्मा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यासाठीची खिलाडू वृत्ती, मेहनत यांचे दर्शन भारतीय संघाने घडवले. या ऐतिहासिक विजयात संघातील सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक - मार्गदर्शक, व्यवस्थापनातील अधिकारी - कर्मचारी असे सर्वांचे निश्चितच योगदान आहे. भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाची सार्थ ओळख जगाला करून देण्याची कामगिरी आपल्या भारतीय संघाने केली आहे. त्यासाठी या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने