आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला.सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल ९६ धावांनी विजय मिळवत विश्वचषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.



बीसीसीआयकडून १३१ कोटींचे बक्षीस जाहीर


या ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाठी १३१ कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी ही घोषणा केली. या बक्षिसात संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षक मंडळींचा समावेश असणार असून रक्कम सर्वांना समसमान पद्धतीने वाटली जाणार आहे.



प्रत्येक खेळाडूला कोटींचा लाभ


माहितीनुसार, टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला सुमारे ६ ते ७ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात आनंदाचे वातावरण असून कर्णधार सूर्यासह संजू सॅमसन यालाही समान बक्षीस मिळणार आहे.


बीसीसीआयने आपल्या निवेदनात संघाचे कौतुक करताना म्हटले की, “टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही अशाच यशासाठी शुभेच्छा.”


यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी बीसीसीआयने १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यंदा त्यापेक्षा ६ कोटी रुपये अधिक देण्यात आले आहेत.


अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकली. या विजयासह टी-२० विश्वचषक कायम राखणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनण्याचा मान भारताला मिळाला.


इतकेच नव्हे तर भारत आता तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला