भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला

श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली आहे. ताज्या घटनेत श्रीवर्धन शहरात भटक्या कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी महिलेच्या अंगावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने उडी मारली आणि चावा घेतला होता.


श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची पैदास वाढली आहे. संपूर्ण श्रीवर्धनमध्ये शेकडो मोकाट भटके कुत्रे फिरत आहेत. प्रत्येक पाखाडी , आळीत टोळक्याने बसलेले भटके कुत्रे नागरिक , विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिकांच्या मागे जात हातातील वस्तू ओढणे तसेच चावा घेण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार करू लागले आहेत. यामुळे स्थानिक त्रस्त आहेत. रस्त्यावरून एकट्याने जात असलेल्याच्या अंगावर उडी मारून चावण्याचे प्रकार वाढले आहेत. श्रीवर्धन तालुक्यात वर्षभरात १८७ जणांना कुत्रा चावण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.


श्रीवर्धन नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण , शस्त्रक्रिया करण्याची मोहीम अनेक वर्षांपासून रखडल्याने दरवर्षी श्वानांची संख्या वाढती आहे.नगरपरिषद हद्दीत प्रत्येक नाका, चौकात श्वानांचे टोळके दिसून येते.श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे व शस्त्रक्रिया करणे याबाबतीत जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु कुठलीही प्राणिमित्र संघटना अथवा ॲनिमल वेल्फेअर एजन्सीने याबाबतीत पुढाकार घेतला नाही. मोकाट श्वान पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी , त्यांना रेबीज लसीकरण करणे , निर्बिजीकरण करणे यासाठी नव्या निविदा काढण्यात येणार आहेत.लवकर अंमलबजावणी होईल असे श्रीवर्धन चे उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांनी सांगितले. दरम्यान शहरी भागात भटके कुत्रे झुंड करून राहतात. रात्रीच्या वेळी हे शहरातील रस्त्यावर झुंडीने

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी