मालाडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले जुने

मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे बांधकाम जुने झाले असून तब्बल ४१ वर्षे जुने असलेल्या या जलाशयाच्या दुरुस्तीचे काम आता महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामांसाठी विविध करांसह तब्बल ०८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे याच जलाशयाची आवार भिंत कोसळून मोठी दुघर्टना घडल्यानंतर येथील आवार भिंतीसह विविध प्रकारची कामे करण्यात आली होती. त्यानंतर आता या जलाशयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे.


मुंबई महापालिकेकडून मालाड परिसरातील विविध भागांना मालाड जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मालाड टेकडीवरील हा जलाशय-२ हा सन १९८४ मध्ये बांधण्यात आला होता. याची पाणीसाठा करण्याची क्षमता सुमारे १८.१४ दशलक्ष लिटर आहे. हा जलाशय ४० वर्षांपेक्षा अधिक जुना झाल्यामुळे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. महापालिकेच्या तांत्रिक सल्लागारांच्या सूचनेनुसार जल अभियांत्रिकी विभागामार्फत जलाशय तसेच त्यासंबंधित नियंत्रण कक्ष क्रमांक १ व २ यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. या तपासणीच्या अहवालानुसार जलाशय आणि नियंत्रण कक्षांची तातडीने व्यापक संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


त्यामुळे पाणी पुरवठा प्रकल्प खात्यामार्फत याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सल्लागाराच्या सूचेनेनुसार निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये देव इंजिनिअरींग ही कंपनी पात्र ठरली आहे. या कामांसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जलाशय व नियंत्रण कक्षांच्या दुरुस्तीमुळे मालाड परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत राहण्यास मदत होईल असे महापालिका पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून हे काम पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर