महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत


मुंबई : राज्यातील व्यावसायिक महाविद्यालयांच्या शुल्क निर्धारण प्रक्रियेत होणाऱ्या अनियमिततेची आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. या चौकशीत गंभीर घोटाळा आढळल्यास थेट 'एसआयटी' (विशेष तपास पथक) मार्फत तपास करून गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.


आमदार महेश शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना पाटील बोलत होते. या चर्चेत आमदार प्रशांत बंब यांनीही सहभाग घेऊन महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर मंत्री पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यात 'शुल्क नियामक प्राधिकरण' (एफआरए) कार्यरत आहे. नियमानुसार, प्रत्येक महाविद्यालयाला त्यांच्या मागील वर्षाच्या लेखापरीक्षित (ऑडिटेड) अहवालाच्या आधारे शुल्क ठरवून दिले जाते. मात्र, काही महाविद्यालये यामध्ये फेरफार करत असल्याचे समोर आले आहे.


प्रत्यक्षात प्राध्यापक कार्यरत नसतानाही कागदावर त्यांचे वेतन दाखवून खर्च वाढवणे, इमारतीचे बांधकाम झालेले नसतानाही त्याचा खर्च ताळेबंदात दाखवून शुल्कात वाढ करून घेणे, शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त अन्य खर्च दाखवून विद्यार्थ्यांच्या माथी अतिरिक्त शुल्काचा भार मारणे, असेही काही प्रकार निदर्शनास आल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास शक्य


"शासकीय सवलतींनुसार अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलते. मात्र, महाविद्यालये चुकीच्या पद्धतीने शुल्क वाढवून सरकारची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही," असे पाटील यांनी सांगितले. चौकशीत तथ्य आढळल्यास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. तसेच चौकशी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत पारदर्शक पद्धतीने शुल्क आकारले जाईल याची काळजी शासन घेईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा