शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अन्नप्रक्रिया आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली. मंत्रालयात कॅनडातील उद्योग व संशोधन क्षेत्रातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी दोन्ही देशांतील कृषी स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींवर सकारात्मक चर्चा झाली.


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेती होणार 'स्मार्ट'


कृषीमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, हवामान बदलाच्या काळात पर्जन्यमान आणि तापमानाचा अचूक अंदाज वर्तवणे हे मोठे आव्हान आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना पेरणीपासून कापणीपर्यंत अचूक मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे. यामुळे शेती केवळ वैज्ञानिकच नाही, तर अधिक नफ्याची ठरेल.


शिक्षण आणि संशोधनात मोठी झेप


या बैठकीचे महत्त्वाचे फलित म्हणजे महाराष्ट्र आणि कॅनडातील कृषी विद्यापीठांमधील संभाव्य शैक्षणिक करार. विद्यार्थ्यांसाठी 'दुहेरी पदवी' (Dual Degree) आणि शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याबाबत चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे.


अन्नप्रक्रिया आणि स्टार्टअप्सना बळ


राज्यातील कृषी अन्नप्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी आणि तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी कॅनडातील गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे. प्रगत पुरवठा साखळी व्यवस्थापन (Supply Chain Management) आणि उत्पादनांचे मूल्यवर्धन (Value Addition) यावर दोन्ही देशांचे तज्ज्ञ एकत्रित काम करतील.


या बैठकीला कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, पोखरा प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांच्यासह इंडो-कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रशांत श्रीवास्तव आणि कॅनडातील नामांकित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


......................


"महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यातील हे सहकार्य केवळ कागदावर न राहता, प्रत्यक्षात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरेल. यातून शाश्वत कृषी पद्धती आणि आधुनिक विज्ञानाचा संगम घडवून आणला जाईल." — दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने