उपमहापौरांची कुपर रुग्णालयाला भेट; स्वच्छता आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर दिले कारवाईचे आदेश

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अवघ्या पाच दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे आकस्मिक भेट दिल्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांनीही या रुग्णालयात भेट देत तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी या रुग्णालयात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे यासारख्या प्रकाराविरोधात नियमानुसार कार्यवाही करावी. त्याअनुषंगाने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश दिले.


महानगरपालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालय येथे उप महापौर संजय घाडी यांनी बुधवारी भेट दिली.यापूर्वी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे आकस्मिक भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची ६ मार्च २०२६ रोजी सविस्तर पाहणी केली. मात्र, या पाहणीदरम्यान रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील आरोग्य सेवा सुविधांबाबत तक्रारींचीच सरबती करत महापौरांनाच भंडावून सोडले. भेटीनंतर घाडी यांनी रुग्णालयातील विविध पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात सुपर स्पेशालिटी क्षमता विकसित करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


यावेळी नगरसेवक दीपक कोतेकर, अनिष मकवाना, सुधा सिंह, डॉ. आर. एन कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता (प्रभारी) डॉ. देव शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयातील अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, बालकांचा कक्ष आदी ठिकाणी उप महापौर संजय घाडी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आदींबाबत रुग्णांसोबतही संवाद साधला. रुग्णालय प्रशासनामार्फत रुग्णांना सद्यस्थितीला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचेही घाडी यांनी कौतुक केले. वैद्यकीय सेवेचा उपनगरीय रुग्णालयांमध्ये डॉ. रु. न. कूपर रुग्णालयावर मोठा ताण येत आहे. रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय सेवांची पूर्तता करण्यासाठी मंजूर पदांचा अनुशेष भरून काढणेही गरेजेचे आहे. रुग्णालयातील विविध पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


रुग्णालयातील स्वच्छतेला प्राधान्य देतानाच रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्णालयात प्रवेश करतेवेळीच तंबाखूजन्य पदार्थ नेता येणार नाही, यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने कडक कार्यवाही करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करावी, असे निर्देशही उप महापौर संजय घाडी यांनी दिले. रुग्णालयात अस्वच्छता करणाऱयांविरोधात कार्यवाहीचा धाक बसावा, यादृष्टीने रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत नियमांची जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही घाडी यांनी शेवटी नमूद केले.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून