“देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते”

- राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका


- देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारचे परिस्थितीवर लक्ष


आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण इस्राईल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकार अत्यंत बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार आणि खरमरीत शब्दात टीका केली.


मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंतरराष्ट्रीय तणावामुळे देशातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी राहुल गांधींवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, संसद सुरू असताना राहुल गांधी नेहमी परदेश दौऱ्यावर असतात. देशाच्या संसदेत चर्चा करण्याऐवजी ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याचे काम करतात. प्रत्येक वेळी संसद अधिवेशनाच्या काळात दुसऱ्या देशात जाऊन भारताविरोधात बोलण्याची त्यांची सवयच झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.


“देशात ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवाया होत असताना आपल्या जवानांनी आणि सुरक्षादलांनी केलेल्या पराक्रमाबद्दल राहुल गांधींना दुःख किंवा अभिमान काहीच वाटत नाही. उलट देशाची प्रतिमा खराब करणारी वक्तव्ये करून पाकिस्तानसारख्या देशांना मथळे मिळवून देण्याचे काम ते करत आहेत,” असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.


भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. देश वेगाने प्रगती करत असताना काही लोकांना त्याचा “पोटदुखी” होत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.


देशाच्या विकासासाठी विधायक काम करण्याऐवजी देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल. देशात राहून देशासाठी काम करा, अशी बोचरी टीका शिंदे यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या